Monday, May 25, 2015

आठवण

तारीख ३१ मे २०१५ वेळ ८.३० pm
आठवण

आठवण तुझी आठवण
वाऱ्याच्या झुळुकेबरोबर येणारी
आणि मनात खोलवर घर करणारी
आठवण तुझी आठवण

तू येणार अशी चाहूल लावणारी
आणि नाही आलास की  हुरहूर  लावणारी
आठवण तुझी आठवण

तू नसताना मला आधार देणारी अन
नंददीपासारखी  सदैव तेवत राहणारी
आठवण तुझी आठवण

कधी खुदकन हसवणारी आणि
कधी ओक्साबोक्शी रडवणारी
आठवण तुझी आठवण

तू दूर असलास तरी जवळ  असल्याची जाणीव देणारी
प्रत्येक पावलावर तू बरोबर आहेस  असं सांगणारी
आठवण तुझी आठवण
आठवण फक्त तुझीच  आठवण

http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

1 comment: