Monday, May 18, 2015

आधार

तारीख  १२/५/२०१५ वेळ  ८.  २१ pm
आधार
रखरखत्या  उन्हासारख्या माझ्या आयुष्यात  पाऊस होऊन  ये तू …….
सुकलेल्या माझ्या आयुष्याच्या  जंगलात हिरवी पालवी घेऊन ये तू  …….
तहानलेल्या माझ्या आयुष्यात झऱ्याचे  सळसळ पाणी घेऊन ये तू  …….
भुकेने व्याकुळलेल्या माझ्या चिमणीच्या चोचीत चारा घेऊन ये तू  …….
मरणासक्त  झालेल्या माझ्या मनाला जीवनदान घेऊन ये तू  …….
भकास झालेल्या माझ्या आयुष्यात मोरपिसाचा स्पर्श घेऊन ये तू  …….
आभाळ कोसळलेल्या माझ्या आकाशाच्या जगात सूर्यकिरण घेऊन ये तू  …….
अमावस्येच्या माझ्या रात्र असलेल्या आयुष्यात चंद्रप्रकाश घेऊन ये तू  …….
अंधारानी झाकोळलेल्या माझ्या जगात काजव्याचा प्रकाश घेऊन ये तू  …….
छप्पर नसलेल्या माझ्या घरात सावली घेऊन ये तू  …….
विष पसरलेल्या माझ्या शरीतात अमृताचे थेंब घेऊन ये तू  …….
खड्डे पडलेल्या माझ्या आयुष्याच्या रस्त्यात गुलाबाच्या पायघड्या घेऊन ये तू  …….
काटे पडलेल्या माझ्या आयुष्यात मेणाचा मऊपणा  घेऊन ये तू  …….
दुर्घंध पसरलेल्या माझ्या  आयुष्यात प्राजक्ताच्या  फुलाचा मोहकता सुगंध  घेऊन ये तू  …….
बोचरी थंडी असलेल्या माझ्या  आयुष्याच्या ऋतू मधे कोवळी उन्हे घेऊन ये तू  …….
कर्णकर्कश्य  आवाज पसरलेल्या माझ्या आयुष्यात बासरीचे नाजूक सप्तसूर घेऊन ये तू  …….
गोंधळ माजलेल्या माझ्या आयुष्यात शांतता घेऊन ये तू  …….
अश्रूंनी भरलेल्या माझ्या चेहऱ्यावर हास्य घेऊन ये तू  …….
Negativity च्या दरीत कोसळलेल्या माझ्या आयुष्यात पहाडाएवढा आत्मविश्वास घेऊन ये तू  …….
पाण्याचा अभाव असलेल्या आणि ओसाड पडलेल्या माझ्या आयुष्यात समुद्राच्या खळखळत्या लाटा घेऊन ये तू  …….
दलदलीचा चिखल साठलेल्या माझ्या आयुष्यात हिरा बनून ये तू  …….
कोंडट  झालेल्या माझ्या मनात आल्हाददायक वारा घेऊन ये तू  …….

http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

16 comments:

  1. Nitin Joglekar says..Good one,
    Keep it up.

    ReplyDelete
  2. pushpalata lale says..Good one ,but ur the only person who can remove negativity from your life .

    ReplyDelete
  3. to type in Marathi link...
    http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

    ReplyDelete
  4. Lavitkumar Mali says... nic poem......pls positive thinking kar

    ReplyDelete
  5. hanmant rachmale says...Very Nice.. :)

    ReplyDelete
  6. sachin supekar says...I like your poem Aadhar !
    But Some Where at End I was Expecting some thing positive...

    ReplyDelete
  7. Sandeep: said are wa very good
    changli ahe ki

    ReplyDelete