Tuesday, July 27, 2010

मला लग्नाची घाई झालीये

तारिख ७ मे २०१०
वेळ रात्री १०.२२

मला लग्नाची घाई झालीये

मला लग्नाची घाई झालीये ,
माझे लग्न करा असे आई बाबांना गेले दीड वर्षे हज्जार वेळा ओरडून सांगितले ,
तर "अजून तू लहान आहेस " हे नेहमीचे त्यांचं उत्तर .... :-(

मला लग्नाची घाई झालीये ,
असं मित्र -मैत्रिणींना सांगितलं तर ते हसतात,
काय घाईये लग्नाची ?
एकटा जीव सदाशिव ,
लग्न करून फसले/फसलो ,
लग्न करून पस्तावले/पस्तावलो ,
ये लड्डू जो खाये पछताये जो ना खाये वो पछताये ....
अशी उत्तरं....

पण हे लोक का समजून घेत नाहीये मला ?
खरं तर बऱ्याचशा मैत्रिणी लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाला आहेत ....
त्यातून ज्या इंडियात उरलेल्या आहेत त्यांना आपण भेटायचे का असं विचारले ,तर
नवऱ्या बरोबर बाहेर जाणार आहे ,
घरी पाहुणे आलेत ,
BOYFRIEND ला भेटायचे आहे ,
घरी मुलगा पाहायला येणार आहे ,
अशी उत्तरं....

बरं ...मित्रांना विचारलं भेटणार का? तर...
बायको बरोबर माहेरी जायचय ,
GIRLFRIEND ला भेटायचय ,
मुलगी बघायला जाणार आहे ,
INTERVIEW आहे ,
PROJECT DEADLINE आहे ,
अशी उत्तरं....

बरं BOYFRIEND बनवायचा तर त्याला माझ्या BEST FRIEND पल्लवीचा नकार ...
BOYFRIEND बनवलास तर माझ्याशी बोलू नकोस हि धमकी ...

आता सांगा माझ्याबरोबर बोलायला ,चालायला ,मनातल्या गोष्टी सांगायला ,हसायला कोणीच नाही .... :-(

लग्न केले तर हक्काचा नवरा असेल ,
बोलण्यासाठी ,मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी ,
हातात हात घालून फिरण्यासाठी ,मला मिठीत घेण्यासाठी ,
हलकेसे चुंबन घेण्यासाठी,भांडण्यासाठी ......
त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन ढसाढसा रडण्यासाठी ....

लग्न केले तर हक्काची सासू असेल .....
COOKING शिकवण्यासाठी ,
सत्संगला जाण्यासाठी ,
बागेत झाडे लावण्यासाठी ....

लग्न केले तर हक्काचा सासरा असेल ,
चहा मागण्यासाठी ,
गोळ्या दे गं म्हणण्यासाठी,
स्वयंपाकातले प्रयोग त्यांच्यावर करण्यासाठी ....

लग्न केले तर हक्काचा दीर असेल ,
JOKE सांगण्यासाठी ,
भाजी आणून देण्यासाठी ,
नवरा बायकोच्या भांडणात माझी बाजू घेण्यासाठी ....

लग्न केले तर हक्काची नणंद असेल ,
SHOPPING ला जाण्यासाठी ,
MOVIE ला जाण्यासाठी ,
नवऱ्याचे लहानपणीचे SECRET आणि गमती- जमती सांगण्यासाठी ....

हि सगळी हक्काची लोकं हवी आहेत ....
म्हणून , मला लग्नाची घाई झालीये .....

http://www.google.com/transliterate/indic/
http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

4 comments:

  1. Malahi tuzya lagnachi ghai zaliye...... :)
    Karan mi mirven na karavali mhanun......... :)

    ReplyDelete
  2. prajakta madam ............ me tumcha fan tar ahech ata AC honar ahe asa wattay !!!!!!!!!

    ReplyDelete
  3. seriously, m tula bhetli nhiye pan bhetachi iccha matra ahe...nice "lagnachi ghai!!"

    ReplyDelete