एक परी होती , मला रोज Phone करून सकाळी उठवायची ,
एक परी होती , मला ढिगाऱ्या म्हणून हाक मारायची ,
एक परी होती , मला रोज exercise कर म्हणून सांगायची ,एक परी होती , bike वर songs म्हणायची ,
एक परी होती , instagram वर रोज reel टाकायची ,
एक परी होती , ipnone ला blue phone म्हणायची
एक परी होती , न बोलताच माझ्या मनातलं सगळं ओळखायची ,
एक परी होती , माझ्या Birthday ला Cake घेऊन यायची ,
एक परी होती , माझ्या बरोबर Movie बगायची ,
एक परी होती , मला Shopping ला घेऊन जायची ,
एक परी होती , Pet Lover होती ,
एक परी होती , साई बाबांची भक्त होती
एक परी होती , बोलायची तर बांगड्यांचा किणकिण आवाज असल्या सारखा वाटायचं ,
एक परी होती , हसायची तर बासरीचे नाजूक सूर वाजत असल्या सारखा वाटायचं ,
एक परी होती , ती समोरून चालत आली तर अंगावर मोरपीस फिरवल्या सारखा वाटायचं ,
एक परी होती , झरा कसा सळसळ वाहतो तसं तिचा bike चा speed असायचा ,
एक परी होती , चांदणे कसे मोत्यासारखे बरसते अगदी तसा असा तिचा सहवास असायचा ,
एक परी होती , कोकिळा कशी साप्तसूरात गाते ना अगदी तसा तिचा आवाज होता,
एक परी होती , वारा कसा आल्हाद वाहतो ना अगदी तसा तिचा आजू बाजूला वावर होता ,
एक परी होती , काजवा कसा चमचम चमकतो ना अगदी तसा तिचा आधार असायचा ,
एक परी होती , गुलाब कसा अलगद उमलतो ना अगदी तशी तिची नजर असायची ,
एक परी होती , धुके पडलेले असताना त्यावर सूर्यकिरणे पडतात ना अगदी तसा स्वभाव होता ,
एक परी होती , वेल कशी अलगद झाडावर विसावते ना अगदी तसा तिचा माझ्या वर हक्क असायचा ,
एक परी होती , हिरा कसा अंधारातही चमकतो ना अगदी तसा स्वभाव होता
No comments:
Post a Comment